महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या तर्फे राज्यस्तरीय आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळा


ऑनलाईन आवेदन

राज्यस्तरीय आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळा : ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी येथे क्लिक करा

सदर विवाह सोहळा जूनच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल.

योजना राबविणारी संस्था/ विभाग

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान

आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे मुख्य उद्दीष्ट

जाती व्यवस्थेच्या विरोधात समताधिष्ठित समाज निर्मिती करणे.

प्रस्तावना

भारतात समताधिष्ठित संविधान लागू झाले त्यामध्ये १९५० मध्ये महिला, आदिवासी, अनुसूचित जाती -जमाती, भटके अशा अनेक घटकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. त्या आधीतर शुद्र आणि स्त्रीयांना जगण्याचाही हक्क नव्हता त्या विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा ऐतिहासिक संघर्ष केला. हिंदू कोड बिल हे सर्वश्रूत आहे. तथापि, आजही स्त्रीयांबाबत ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. जातीप्रथा व त्यामुळे होणारा हिंसाचार विकसनशील भारतापुढील एक मोठे आव्हान आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जातीचे अस्तित्व व स्वजातीय विवाहाला असणाऱ्या सामाजिक मान्यतेमुळे आहे. त्यामुळे आंतरजातीय व आंतरधार्मिय विवाह यांना सातत्याने तीव्र विरोध दिसून येतो. डॉ.आंबेडकर (१९३६)हे जाती निर्मुनाकरिता आंतरजातीय विवाहाला एक स्त्री-पुरुष समानता गतिमान करण्याचे एक प्रभावी माध्यम सुध्दा आहे.परंतु आंतरजातीय विवाहाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.एका सर्वेक्षणानुसार आज भारतात होणाऱ्या एकूण लग्ना पैकी ५ टक्के विवाह हे आंतरजातीय लग्न आहेत.आंतरजातीय विवाहाला होणाऱ्या तीव्र विरोधामुळे व हिंसाचारामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सुध्दा अशा जोडप्यांना संरक्षण व मदतीची गरज असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. आज भारतात विविध संस्थांव्दारे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन व मदत म्हणून आर्थिक मदत करण्याऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन व मदत म्हणून आर्थिक मदत करण्याची तरतूद केली आहे. महाराष्ट्र शासनाने सुध्दा वेळोवेळी या संबंधी सूचना व निर्णय निर्गमित केले आहे.(शासन निर्णय दि.३० जानेवारी,१९९९,सुधारीत निर्णय दि.६ ऑगस्ट २००४) केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व क्षमीकरण मंत्रालयाव्दारे सुध्दा आंतरजातीय जोडप्यांना प्रोत्साहन देण्याकरीता राष्ट्रीय स्तरावर योजना सुरु करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन,नवी दिल्ली यांच्यातर्फे आंतरजातीय विवाह करण्याऱ्या जोडप्यांना प्रोत्साहना करीता 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता योजना' सुरु आहे.

आंतरजातीय सामुहिक विवाह सोहळ्यामागील भुमिका

भारतीय संविधानाला अपेक्षित समता,स्वातंत्र,बंधुता व न्याय या मुद्यांवर आधारित समाज व राष्ट्र निर्माण करायचे असल्यास जातीचे अस्तीत्व व त्याला हजारो वर्षापासून घट्ट धरून ठेवणाऱ्या स्वजातीय विवाहांना असणाऱ्या मान्यतेला, आंतरजातीय विवाहांना होणाऱ्या विरोंधाचा विचार करणे आवश्यक आहे. आंतरजातीय विवाह हा फक्त सामाजिक अभीसरणाचीच प्रक्रीया गतीमान करत नाही तर आंतरजातीय विवाह, व्यक्ती स्वातंत्र्याची ग्वाही देते. भारत हा हजारो जातींचा देश आहे. एक विकसीत देश म्हणून ओळख निर्माण करणऱ्यास अद्यापही भारताला बराच प्रवास करायचा आहे. या देशात जातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेली दरी, जातीय उच्चनीचतेच्या उतरंडीमुळे अस्तीत्वात असलेला द्वेष यावर मात करून एकवाक्यता तयार करून राष्ट्र निर्माण करण्याचा प्रक्रियेला गतीमान करणे यासाठी ही बाब या प्रवासातील मैलाचा दगड राहणार आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्याला विज्ञान निष्ठ समतेच्या व न्यायाच्या विचारांची बीजे रोवणाऱ्या महामानवांचे व संताचे मार्गदर्शन प्राप्त झाले हे. आंतरजातीय विवाहाबाबत महाराष्ट्र राज्याचा इतिहास रोचक राहिला आहे. आधुनिक भारतातल्या पहिला आंतरजातीय विवाह म्हणून ज्याची कदाचित गणना करता येईल तो राष्ट्रपिता जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा दत्तक पुत्र डॉ.यशवंत व ससाणे दांम्पत्याची मुलगी राधाबाई यांचा दि.४ फेब्रुवारी १८८९ रोजी झालेला विवाह हा याच महाराष्ट्रातला. या विवाह सोहळ्यास १२९ वर्षे पूर्ण झाले व १३० व्या वर्षात सदर सोहळ्याची महाराष्ट्र शासनातर्फे पुनरावृत्ती करीत आहे. महाराष्ट्राचे गौरव व अभिमान असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब आंबेडकर यांचा विवाह सुद्धा याच राज्यातला. मुलींना त्यांच्या मताप्रमाणे जोडीदार निवडण्याचा हक्क मिळणे, तसे वातावरण तयार होणे हे संविधानाला अभीप्रेत स्वातंत्र्य या मुल्यांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होय. या मुल्यांचे महत्व राजश्री शाहू महाराजांना आजच्या १०० वर्षापूर्वीच पटले होते. म्हणूनच त्यांनी १२ जुलै १९१९ रोजी विवाह संबधीचा एक कायदा पारित करून १८ वर्षावरील मुलींना स्वमर्जीने लग्न करण्याची संमती प्रदान केली. तसेच आंतरजातीय विवाहांना प्रोस्ताहन दिले. विविध अर्थाने हा कायदा आपल्या काळाच्या पुढेच होता. या ऐतिहासिक, दुरगामी व अतीशय पुरोगामी कायद्याच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष! या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्यावतीने प्रथम आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानाद्वारे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक प्रोत्साहनाची योजना विचाराधिन होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानाच्या नियामक मंडळाची सहावी बैठक दि.८.११.२०१७ मधील ठराव क्रमांक १९ नुसार या संदर्भात निर्णयही घेण्यात आला आहे.

उद्दिष्ट

भारताला स्वातंत्र्य मीळून जवळपास सात दशके होत आहेत. असे असूनही वर्तमान स्थितीत स्त्रीयांची परिस्थिती त्यांच्याकडे पाहण्याची समाजाची मानसिकता पूर्णपणे बदललेली नाही. आजही महिलांना आपल्या हक्क आणि अधिकारासाठी संघर्ष करावा लागतो. मुलींचा जन्म, जातपंचायतीसाठी जाचक पद्धत, हुंडा पद्धतीतून होणार छळ, हत्या व आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या ऑनर किलिंगच्या घटना सुरू आहेत. या कुप्रथांच्या विरोधात तीव्र संघर्ष करणे आवश्यक आहेत.
समाजातील अंधश्रद्धा, जातीय वाद, सारंजामी रूढी परंपरा, जातपंचायतीच्या नावाची बंधने समाजातून नष्ट करणे हे उद्दिष्ट आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुरक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते सुद्धा जातीच्या निर्मूलनावर " आंतरजातीय विवाह हाच (त्यावरचा) खरा उपाय आहे, अशी माझी खात्री पटली आहे. केवळ रक्ताची सरमिसळच आप्तस्वकीय असल्याची भावना निर्माण करू शकते आमि नाते संबंधाची, एक सारखे असल्याची ही भावना सर्वात महत्वाची ठरल्याशिवाय जातीने निर्माण केलेली विभक्तवादी परका असल्याची भावना नाहीशी होणार नाही".

प्रोत्साहनपर मदतीचे स्वरूप

1) रूपये २,५०,००० /- रक्कम

2) आंतरजातीय सामूहिक विवाहास येणार खर्च विभागामार्फत करण्यात येईल.

3) सन्मानपत्र

आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे स्वरूप

विशेष सार्वजनिक समारंभात शासनाने ठरविलेल्या ठिकाणी सन्मानीय मंत्री/राज्यपाल/मुख्यमंत्री/प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीत पात्र व नोंदणी केलेल्या जोडप्यांचे सामूहिक लग्न लावल्या जातील.

या योजनेची व्याप्ती

महाराष्ट्रातील ५० जोडपे

कार्यक्रमाचा खर्च

आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचा खर्च डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या मार्फत केला जाणार आहे.

ऑनलाईन आवेदन

राज्यस्तरीय आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळा : ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी येथे क्लिक करा

चरित्र प्रमाणपत्र स्वरूप

येथे क्लिक करा

आंतरजातीय सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी व लाभार्थी होण्याकरीता पात्रता, अटी व शर्ती

येथे क्लिक करा